FAQ - GanitPlus - JNVST & Sainik School Preparation

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

येथे तुम्हाला 'गणित प्लस' बद्दलच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळतील.

1. नवोदय प्रवेश परीक्षा

1. नवोदयची परीक्षा किती मार्कांची असते?
नवोदयची परीक्षा 100 गुणांची असते आणि त्यात एकूण 80 प्रश्न असतात.
2. परीक्षा कोणत्या महिन्यात असते?
नवोदयची परीक्षा साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होते.
3. नवोदयचा अभ्यासक्रम काय असतो?
अभ्यासक्रमात मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित, आणि भाषा या तीन विषयांचा समावेश असतो.
4. या बॅचेसमध्ये फक्त नवोदयची तयारी करून घेतली जाते का?
नाही, ‘आरंभ’ आणि ‘उड्डाण' या दोन बॅचेसमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारीसाठी आहेत. ‘आरंभ प्रो’ आणि ‘उड्डाण प्रो’ या दोन बॅचेसमध्ये जवाहर नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारीसाठी आहेत.
5. कोणत्या इयत्तेसाठी बॅचेस आहेत?
‘आरंभ’ आणि ‘आरंभ प्रो’ या बॅचेस इ. 4थी साठी आहेत. ‘उड्डाण’ आणि ‘उड्डाण प्रो’ या बॅचेस इ. 5वी साठी आहेत.

2. कोर्स आणि अभ्यासक्रम

1. 'गणित प्लस' चा अभ्यासक्रम इतर क्लासपेक्षा वेगळा कसा आहे?
आम्ही IIT च्या तयारीचा पॅटर्न वापरतो, जो संकल्पना मजबूत करून सरावावर भर देतो. आम्ही मुलांना रटाळ शिक्षणाऐवजी मनोरंजक पद्धतीने शिकवतो. यासाठी आम्ही 4 पायऱ्यांची पद्धत वापरतो:
  • संकल्पना: लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ, ऑडिओ पॉडकास्ट, क्लिष्ट संकल्पनांसाठी इलस्ट्रेशन व्हिडिओ, प्रत्येक धड्यासाठी ई-बुक्स.
  • सराव: रोजची टेस्ट, गणित गेम्स, मागील 16 वर्षांच्या प्रश्नपत्रिका, 100+ मॉक टेस्ट, आणि घटक सराव चाचण्या.
  • उजळणी: परीक्षेच्या आधी कमी वेळेत अभ्यासासाठी माइंडमॅप्स आणि फ्लॅशकार्ड्स.
  • मार्गदर्शन: अभ्यास कसा करावा याचे नियोजन आणि पालकांसाठी चर्चासत्रे.
नवोदयच्या यशस्वी तयारीसाठी लागणारे सर्व काही!
2. लाईव्ह क्लासेस कधी असतात?
लाईव्ह क्लासेस सोमवार ते शनिवार असतात. आरंभ बॅच सकाळी 7 ते 8:30 आणि उड्डाण बॅच सायंकाळी 7 ते 8:30. जर तुमचा क्लास बुडाला, तर त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपवर कधीही पाहता येते.
3. 'कॉमिक्स' आणि 'पॉडकास्ट'चा अभ्यासात काय उपयोग?
मुलांना वाचण्याचा कंटाळा येतो, म्हणून आम्ही अभ्यासाची गोडी लावण्यासाठी चित्रांच्या स्वरूपात कॉमिक्स आणि प्रवासात ऐकण्यासाठी ऑडिओ पॉडकास्ट बनवले आहेत. यामुळे मुले खेळासारखा अभ्यास करतात आणि संकल्पना लवकर लक्षात राहतात. (कॉमिक्स पुस्तके जुलै 2026 नंतर ॲपवर येतील, आणि मोजक्या संकल्पनांची असतील)
4. बॅचेस कधीपासून सुरू होत आहेत?
इयत्ता 4थी (आरंभ बॅचेस) या 1 जून 2026 आणि 5वी (उड्डाण बॅचेस) या 5 मे 2026 पासून सुरू होत आहेत. बॅच वेळ आरंभ सकाळी 7:00 ते 8:30 आणि उड्डाण बॅच सायंकाळी 7 ते 8:30.
5. आरंभ (4थी) आणि उड्डाण (5वी) बॅचची फी किती आहे?
इयत्ता 4थी च्या 'आरंभ बॅच'ची फी ₹3999 व 'आरंभ प्रो बॅच' ची फी ₹4999 आहे आणि इयत्ता 5वी च्या 'उड्डाण बॅच'ची फी ₹4999 व 'उडान प्रो बॅच' ची फी ₹7499 आहे. यात संपूर्ण वर्षाचा ॲक्सेस मिळतो.
6. कोर्सचा डेमो (नमुना) कुठे पाहता येईल?
तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवर ( www.youtube.com/@GanitPlusApp) जाऊन आमचे व्हिडिओ पाहू शकता. वेबसाईटवर डेमो बॅच पाहण्यासाठी या लिंकवर जा: येथे क्लिक करा. तसेच, तुम्ही आमचे ॲप डाऊनलोड करून त्यावरही डेमो कोर्स पाहू शकता. लाइव क्लास डेमो पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://youtu.be/qifVyYDtQZU?si=9TRLwcsOnAZ1yfv0
7. गणित प्लसच्या बॅचेस कुठे पाहता येतील?
टॅब्लेट आणि लॅपटॉपसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर ( www.GanitPlus.com) जाऊन बॅचेस पाहू शकता. मोबाईल फोनसाठी तुम्ही आमचे ॲप डाऊनलोड करू शकता. ॲप लिंक: येथे क्लिक करा
8. गणित प्लस मध्ये शिक्षक कोण आहेत?
प्रभाकर गुंड हे मुख्य शिक्षक आहेत. तेच सर्व लाईव्ह क्लास घेतील. ते नवोदय विद्यालय सोलापूरचे माजी विद्यार्थी आहेत. IIM Mumbai, VNIT Nagpur मधून शिकलेले आहेत. त्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये स्कोर खालीलप्रमाणे होता: IIT JEE 2011 - 99.1 %ile, AIEEE 2011 - 99.5 %ile, CAT 2018 - 98.54 %ile.

3. सराव परीक्षा आणि टेस्ट सिरीज

1. मला मोफत टेस्ट देता येईल का?
होय! आम्ही दोन प्रकारच्या मोफत टेस्ट घेतो:
  • साप्ताहिक घटक चाचणी: दर रविवारी सकाळी 11:30 ते 12:30.
  • मासिक पूर्ण सराव परीक्षा: महिन्याच्या 4थ्या रविवारी सकाळी 11:30 ते 1:30.
या टेस्ट सर्वांसाठी खुल्या आहेत. या 1 जून 2026 नंतर चालू होतील.
2. जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील का?
होय, आम्ही मागील 16 वर्षांच्या (2011 पासून) सर्व मागील प्रश्नपत्रिका उत्तरांसहित आणि स्पष्टीकरणासहित देतो. धड्यानुसारही तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता.
3. AI चा शिक्षणात कसा वापर करता आणि 'स्टडी मित्र 24/7' म्हणजे काय?
आम्ही विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञान अभ्यासामध्ये कसे वापरायचे हे शिकवतो. अभ्यासासाठी कस्टम प्रॉम्प्ट्स देतो. फ्री ॲप (जेमिनी, चॅटजीपीटी) कसे वापरायचे हे शिकवतो आणि आमचा स्वतःचा AI चॅट सहाय्यक आहे. अभ्यास करताना तुम्हाला कधीही शंका आली, तर तुम्ही AI मॉडेलला विचारू शकता आणि क्षणात उत्तर मिळवू शकता. यासाठी शिक्षकांची वाट पाहण्याची गरज नाही.

4. पालकांसाठी

1. माझ्या मुलाची प्रगती मला कशी समजेल?
पालकांसाठी आम्ही खालील सुविधा देतो:
  • मासिक प्रगती अहवाल: दर महिन्याला मुलाने किती अभ्यास केला, किती मार्क्स मिळाले याचा रिपोर्ट.
  • पालक-शिक्षक सभा: दर महिन्याला शिक्षक आणि पालकांची ऑनलाइन मीटिंग. 
    ह्या सुविधा जून 2026 महिन्यापासून चालू होईल.

5. अकाऊंट, पेमेंट आणि नियम

1. गणित प्लस ॲप कसे डाऊनलोड करावे?
मोबाईलवर ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
  1. तुमच्या मोबाईलवर 'Play Store' ॲप उघडा.
  2. वरती सर्च बारमध्ये 'GanitPlus' असे टाईप करून सर्च करा.
  3. GanitPlus JNVST Marathi नावाचे ऍप सर्च पर्यायमध्ये दिसेल.
  4. आमच्या ॲपवर क्लिक करून 'Install' बटनावर दाबा.
  5. डाऊनलोड पूर्ण झाल्यावर 'Open' वर क्लिक करून ॲप सुरू करा.
सध्या आमचे ऍप हे अँड्रॉईड मोबाईल साठी आहे. आयओएस (iOS) लवकरच लॉनच होत आहे.
2. ॲपवर नवीन अकाऊंट कसे तयार करावे?
अधिक जलद आणि सोप्या प्रक्रियेसाठी 'Sign up with Google' हा पर्याय वापरा. यावर क्लिक करून तुमचे गुगल अकाऊंट निवडल्यास एका क्लिकमध्ये तुमचे अकाऊंट तयार होईल. तुम्ही बाकीचे साइन अप स्क्रीन वर दिलेले पर्याय वापरू शकता.
3. मी माझा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी बदलू शकतो का?
नाही. सुरक्षेच्या कारणास्तव आणि डेटा ट्रॅकिंगसाठी, एकदा नोंदणी केलेला मोबाईल नंबर किंवा Email ID बदलता येत नाही. कृपया कायमस्वरूपी नंबरच वापरावा.
4. कोर्स फी भरल्यावर पैसे परत मिळतील का?
नाही. आमची 'नो रिफंड पॉलिसी' (No Refund Policy) आहे. एकदा मेंबरशिप घेतली की ती रद्द करता येत नाही किंवा दुसऱ्या कोणाला हस्तांतरित करता येत नाही.
5. इन्स्टॉलमेंट (हप्ते) मध्ये पेमेंट करता येईल का?
नाही, पण तुम्ही 499 चा ट्रायल प्लॅन घेऊन 1 महिना आमचा कोर्स कसा आहे हे पाहू शकता. 1 महिन्यानंतर तुम्हाला राहिलेले पेमेंट करावे लागेल. उर्वरित फी वेळेत न भरल्यास तुमचा बॅचचा ॲक्सेस तात्पुरता खंडित होईल.
6. ₹499 ट्रायल प्लॅनमध्ये उर्वरित पेमेंट नाही केले तर काय होईल?
₹499 ही 1 महिन्याची फी आहे. उर्वरित फी वेळेत न भरल्यास तुमचा बॅचचा ॲक्सेस तात्पुरता खंडित होईल.
7. पेमेंट फेल झाले तर काय करावे?
पेमेंट फेल झाल्यास आणि पैसे खात्यातून कट झाल्यास, ते 24 ते 48 तासांत तुमच्या बँक खात्यात परत जमा होतात. तुम्ही पुन्हा पेमेंटचा प्रयत्न करू शकता. 48 तासांत फेल पेमेंटचे पैसे नाही आले तर आमच्या टीमला संपर्क करा. (फोन नंबर 9867492958, ईमेल info@ganitplus.com)

6. सपोर्ट आणि संपर्क

1. ॲप किंवा पेमेंटमध्ये अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा?
तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता.
संपर्क क्रमांक: +91-98674-92958
ईमेल: info@GanitPlus.com
2. तुम्ही नवोदय किंवा सैनिक स्कूल सिलेक्शनची गॅरंटी देता का?
नाही. आम्ही 100% प्रामाणिक आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शन देतो, पण अंतिम सिलेक्शन हे विद्यार्थ्याची मेहनत आणि सातत्य यावर अवलंबून असते.

7. संस्था आणि निकाल

1. मागील वर्षाचा निकाल काय आहे?
आमची संस्था ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झाली. 2025 च्या आधी प्रभाकर सरांच्या मार्गदर्शनाखाली 10+ विद्यार्थ्यांचे आणि 2025 मध्ये आमच्या टेस्ट सिरीजमधून 1 विद्यार्थ्याचे नवोदयमध्ये सिलेक्शन झाले आहे.
2. गणित प्लस अधिकृत नवोदय समितीशी संलग्न आहे का?
गणित प्लस ही एक खाजगी कोचिंग संस्था आहे. आम्ही अधिकृत जवाहर नवोदय विद्यालय समिती किंवा कोणताही सरकारी विभाग नाही. आम्ही केवळ प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो. प्रवेश, निकाल किंवा धोरणांबद्दलच्या कोणत्याही अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइट ( navodaya.gov.in) वर भेट द्या.

अजून काही प्रश्न आहेत? आमच्याशी संपर्क साधा:

अस्वीकरण (Disclaimer):

गणित प्लस ही एक खाजगी कोचिंग संस्था आहे. आम्ही अधिकृत जवाहर नवोदय विद्यालय समिती (NVS) किंवा कोणताही सरकारी विभाग नाही. आम्ही केवळ प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो. प्रवेश, निकाल किंवा धोरणांबद्दलच्या कोणत्याही अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर भेट द्या.

Disclaimer:

GanitPlus is a private coaching institute. We are not affiliated with the official Jawahar Navodaya Vidyalaya Samiti (NVS) or any government department. We only provide guidance for the entrance exam. For official information regarding admissions, results, or policies, please visit the official website navodaya.gov.in.