There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
नवोदय विद्यालय प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या इयत्ता ४थी आणि ५वी मधील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी 'नवोदय प्लस' (NavodayaPlus) हे हक्काचे व्यासपीठ आहे.
आमचा उद्देश:
खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणासाठी शहरात जावे लागू नये, तर त्यांना घरबसल्या देशातील सर्वोत्तम अशा नामांकित संस्था मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ शिक्षकाकडून 'जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी' (JNVST) साठी परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे, या प्रामाणिक उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.
पालकांचा सहभाग:
विद्यार्थी लहान असल्याने, पालकांच्या देखरेखीखाली (Under Parental Supervision) त्यांना सोप्या भाषेत डिजिटल शिक्षण देणे, हे आमचे वैशिष्ट्य आहे. आम्ही केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना यशासाठी तयार करतो. आमची संपूर्ण टीम आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर आहे.
आमचे सर्व शिक्षक उच्चशिक्षित असून, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा दांडगा अनुभव आहे.
संस्थापक आणि शिक्षक
"नवोदयचे माजी विद्यार्थी (Alumni) आणि नवोदय प्लसचे संस्थापक"
प्रभाकर सर स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मुलांच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. ते गणित, मानसिक क्षमता आणि मराठी विषयांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात.
शिक्षण:
शिक्षक आणि सल्लागार
"गणिताची भीती घालवणारे तज्ञ"
अमित सर उच्चशिक्षित आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की मुलांना गणिताची भीती न वाटता गोडी लागते. ते शैक्षणिक सल्लागार म्हणूनही काम पाहतात.
शिक्षण:
तंत्रज्ञान प्रमुख आणि शिक्षक
"तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सांगड"
पदमाक्ष सरांचे तांत्रिक कौशल्य ॲपला आधुनिक बनवते. आपल्या शिक्षणाचा उपयोग करत ते मराठी माध्यमातील मुलांना गणित आणि बुद्धिमत्ता विषय आधुनिक पद्धतीने शिकवतात.
शिक्षण:
देशातील नामवंत संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची टीम.
कठीण संकल्पना मराठीतून सहज समजतील अशा भाषेत.
मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी 24 तास उपलब्ध असलेला आधुनिक सहायक.
व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि मागील 16 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव.
आजच 'नवोदय प्लस' परिवारात सामील व्हा आणि आपल्या मुलांचे नवोदयचे स्वप्न पूर्ण करा!
आत्ताच जॉईन करामराठी: नवोदय प्लस (NavodayaPlus) हा एक खाजगी आणि स्वतंत्र शैक्षणिक उपक्रम आहे. आमचा भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, किंवा 'नवोदय विद्यालय समिती' (NVS) यांच्याशी कोणताही अधिकधिकृत किंवा कायदेशीर संबंध नाही. आम्ही केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खाजगीरीत्या मार्गदर्शन आणि सराव साहित्य उपलब्ध करून देतो.
English: NavodayaPlus is a private and independent coaching initiative. We are NOT affiliated with, authorized by, or endorsed by the Government of India, the Ministry of Education, or the Navodaya Vidyalaya Samiti (NVS). Our courses and study materials are developed independently to assist students in their preparation for the Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test (JNVST).
"NavodayaPlus" हे नाव ट्रेडमार्क कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे (Application No: 7261815). या वेबसाईटवरील सर्व शैक्षणिक साहित्य, ऑडिओ पॉडकास्ट आणि व्हिडिओ हे 'नवोदय प्लस'च्या मालकीचे आहेत.