आमची छोटी सुरुवात, पण स्वप्न मात्र मोठं!
महत्त्वाची घोषणा

आमची छोटी सुरुवात, पण स्वप्न मात्र मोठं!

नवोदय प्लस ते 'गणित प्लस' (GanitPlus): आमचा एक नवीन आणि प्रामाणिक प्रयत्न.

टीम गणित प्लस (GanitPlus)
6 फेब्रुवारी 2026
Ganit Plus Cover

नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,

मी प्रभाकर, संस्थापक गणितप्लूस (आधीचे नवोदयप्लस), आज मला तुमच्याशी आमच्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल आणि त्यामागच्या भूमिकेबद्दल सांगायचं आहे.

तुम्हाला माहित असेलच, गेल्या वर्षी आम्ही एका साध्या विचाराने सुरुवात केली होती. आम्ही फक्त 10 विद्यार्थ्यांची एक बॅच निवडली आणि त्यांना नवोदयप्लस नावाने शिकवायला सुरुवात केली. त्या 10 मुलांसाठी आम्ही आमची टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक मार्गदर्शन दिले.

त्या मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून आम्हाला जो उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आमचा उत्साह खूप वाढला. आम्हाला खात्री पटली की आपण हे काम आता फक्त 10 मुलांपुरते मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलापर्यंत नेले पाहिजे.

पण... नाव का बदलले?

आम्ही जेव्हा या विस्ताराचा विचार करू लागलो, तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात आली. नवोदय या नावात एक वजन आहे, कारण ते थेट सरकारी शाळेची आठवण करून देते.

आम्ही विचार केला की, उद्या कोणत्याही पालकाचा असा गैरसमज होऊ नये की आम्ही 'सरकारी संस्था' आहोत. आम्हाला कोणाचीही दिशाभूल करून किंवा सरकारी नावाशी साधर्म्य साधून मोठे व्हायचे नाही. आमचा पाया हा पारदर्शकता आणि विश्वास असला पाहिजे.

म्हणूनच, कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी...

आम्ही आता 'GanitPlus' (गणित प्लस)

करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही आता आमची अधिकृत ओळख आहे: हे नाव आम्ही कायदेशीररित्या सुरक्षित केले आहे, जेणेकरून पालकांना खात्री पटेल की ते योग्य ठिकाणी आहेत.

ट्रेडमार्क ॲप्लिकेशन क्रमांक: 7505070

भविष्यातील योजना:

आता आम्ही जुन्या पद्धतीसोबतच नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येत आहोत. ग्रामीण भागातील मुलांसाठी आम्ही खास मोबाईल ॲप आणि अभ्यासात मदत करण्यासाठी AI Agent (एआय एजेंट – कृत्रिम बुद्धिमता) आणत आहोत.

अमित, पद्माक्ष आणि मी (प्रभाकर) - आमची टीम तीच आहे, जिद्द तीच आहे, फक्त नाव नवीन आणि स्वतःचे आहे.

आमच्या या नव्या, अधिकृत प्रवासात तुमची साथ अशीच राहू द्या!

आपला,

प्रभाकर

संस्थापक, GanitPlus.com

© 2026 गणित प्लस (GanitPlus) (पूर्वीचे नवोदय प्लस). सर्व हक्क राखीव.